नागपूर : जळगावला झालेल्या आंदोलना नंतर आता मात्र बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की आंदोलन परत मोठं होईल. ते म्हणाले, जर सरकार किंवा कोणते अधिकारी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार नसतील तर थेट अधिकाऱ्याच्या कार्यालयात किंवा पालकमंत्र्याच्या घरी जाऊ. त्यांनी गुलाबराव पाटीलवर इशारा करत म्हणाले, “गुलाबरावच्या घरी जाऊ, बघू त्यांनी आमचं स्वागत कसं करतात.”
आम्ही आंदोलन करणार
बच्चू कडू म्हणाले, “येत्या ५ ऑक्टोबरला आम्ही जळगावमध्येच आहोत. बघू मंत्री-अधिकारी काय म्हणतात. या आंदोलनात मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जाईल आणि ते अधिकारी-राजकारणी म्हणून येतील. बघू शेतकऱ्याचा मुलगा जिंकतो की राजकारणी. आमचा पुढचा मोर्चा हा मुख्यमंत्रीच्या गावात किंवा मुंबई, नागपूर, नांदेडच्या मधोमध कुठेतरी होईल.”
आमचे प्रश्न मिटवा – बच्चू कडूंचा इशारा
“आमचे प्रश्न जोपर्यंत मिटत नाहीत, कर्जमुक्तीची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. दुष्काळ जाहीर झाला आहे, दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे. आणि दुष्काळ जहाल झाला की कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. सोयाबीनला भाव नाही, ३४०० ला विकावं लागत आहे. कापसाचे भाव आज मार्केटमध्ये ६ ते ७ हजार दरम्यान आहेत. त्यामुळेच तुम्ही हे खरेदी केंद्र सुरु करा. आम्हाला सांगा, किती कापूस, किती तूर, किती सोयाबीन तुम्ही आमच्याकडून खरेदी करणार आहात याची घोषणा करा,” असं देखील बच्चू कडूंनी सांगितलं.
केंद्र सरकारचे सर्वे नव्हे, तर देशाचा आर्थिक सर्वे
एका परिवाराचं महिन्याचं इनकम १० हजार आहे असं सरकार सांगतं. पण वर्षाचं शेतकऱ्याचं इनकम २० हजारच्या वर नाही. हे आम्ही नाही तर देशाचा आर्थिक सर्वे सांगतोय. आज जर शेतकऱ्याला काहीच नफा नाही दिसत आहे तर तो जगणार कसा? नेपाळसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडूंचे तिखट बोल
अधिकारी व मंत्र्यांनी जर आमच्या समस्या ऐकून निर्णय घेतले नाहीत, तर त्यांच्या कार्यालयात कुटार भरू, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, “जातीच्या नावावर तुम्ही वातावरण सांभाळता आहात, पण शेतकऱ्यांच्या लक्षात सर्व आहे. तुम्ही हिंदू म्हणून नारे लावता, पण रोज तोच हिंदू शेतकरी मरतो. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं जातं?” असा प्रश्न कडूंनी केला.
“जर अधिकाऱ्यांनी आमची आवेदनं स्वीकारली नाहीत तर ते अधिकारी मार नाही का खाणार?” असा इशारा देत ते म्हणाले, “जळगाव जिल्हाधिकारी आमच्या हातून खूप वाचले आहेत. जर अधिकारी ऐकणार नाही तर आम्ही गेट तोडून जाऊ, आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मागार घेणार नाही. २८ तारखेला होणाऱ्या आंदोलनात पूर्ण नागपूरभर शेतकरी जमा होणार आणि आवाज उठवणार,” असं ते म्हणाले.









