Home City post वारकरी मंचतर्फे आषाढी एकादशीला भव्य श्री विठ्ठल महाआरती संपन्न

वारकरी मंचतर्फे आषाढी एकादशीला भव्य श्री विठ्ठल महाआरती संपन्न

नागपूर: आषाढी एकादशी निमित्त वारकरी मंच, महाराष्ट्र राज्य, नागपूर शहर यांच्या वतीने शहरातील श्री परब्रम्ह विठ्ठल रखुमाई हनुमान शीतला माता मंदिर दुबे नगर महालक्ष्मी नगर, हुडकेश्वर रोड येथे भव्य श्री विठ्ठल महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याला वारकरी, भाविक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशा, टाळ-मृदंगाच्या आणि हरिनामाच्या गजरात श्री विठ्ठल महाआरती करण्यात आली. यावेळी २८८ वे संस्करण पूर्ण करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या भाग संघचालक मा. मनोहररावजी सपकाळ, अयोध्या भाग संपर्क प्रमुख शार्दुलजी सोनाने, सह-संपर्क प्रमुख हरीशजी सोनावले उपस्थित होते. त्यांनी महाआरतीमध्ये सहभाग घेऊन भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी संपर्क विभागाचे सुरेंद्र मोहतकर, डॉ. कुऱ्हाडे व डॉ. पूजाताई धांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनोहररावजी सपकाळ म्हणाले की, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. अशा धार्मिक कार्यक्रमांमधून समाजात एकता, शिस्त आणि भक्तीभाव वाढतो. व प्रत्येक मंदिरात दर शनिवारी आरती झाली पाहिजे”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारकरी मंच, नागपूर शहरच्या सर्व पदाधिकारी दिनेश कांबळे, मनीष ठवकर, तेजस घोडे, गिरीश डोये, रुद्र बोंदरे, प्रसाद मांडवगडे, गौरव शिंदे ज्ञानेश्वर टोंगे, महेंद्र थिगळे, किशोर नांदरे महिला सज्जन शक्ती तन्वी भेंडे, कोमल डोणारकर, भारती आमटे, योगिता लांजेवार, छाया चंद्रगिरे, पुष्पा टोंगे, शुभांगी फटिंग, टीम विठ्ठल पदाधिकारी मानस रोडे, दुशांत जुनघरे, रिद्धीश सावरकर, भावेश बुरिले यांनी परिश्रम घेतले. आरतीच्या शेवटी नागपुर जिल्हा अध्यक्ष मयुर गीता रामदासजी वाजगे यांनी टीम रामा पदाधिकारी, लवकुश पदाधिकारी, टीम दुर्गा पदाधिकारी व मंदिर समितीचे व परिसरातील सर्व नागरिकांचे सर्वांचे आभार मानले.