हॅमिल्टन: सणासाठी पुरेसा वेळ मिळाला नसतानाही संघाने मायदेशात खेळणाऱ्या बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत केले. या कामगिरीमुळे आगामी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी योग्य वातावरण तयार झाले आहे, असे सांगत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक केले.
भारतीय संघपहिल्या टी-२० सामन्याच्या काही दिवस आधीच न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे खेळाडूंना तयारीसाठी केवळ एक दिवस मिळाला. मालिकेदरम्यान विश्रांतीची संधीही मर्यादित होती. या परिस्थितीत भारतीय संघाने मालिका जिंकात आपली क्षमता सिद्ध केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीर यांचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात गंभीर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
Read Also: न्यूझीलंडचा शेवटच्या सामन्यात विजय; भारताने ३-२ ने मालिका जिंकली!
गंभीर यांचे प्रेरणादायी भाषण
गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी संवाद साधताना खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, “या मालिकेत तुम्ही जशी कामगिरी केली, त्याबद्दल तुम्हाला खूप अभिमान वाटायला हवा. विशेषतः तयारीसाठी तुम्हाला केवळ एक दिवस मिळाला होता. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांच्या मैदानावर खेळून विजय मिळवणे, ही अभिमानाची बाब आहे. तुम्हाला अखेरचे दोन सामनेही जिंकायचे होते; मात्र कधीकधी असे घडते. पण मला वाटते की, तुम्ही आगामी सामन्यासाठी वातावरण तयार केले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी मी म्हटले होते की, हे वातावरण तयार करण्याची जबाबदारी आपकी आहे.” गौतम गंभीर पुढे म्हणाले, “आता एकदिवसीय आणि कसोटी संघातील खेळाडूंची जबाबदारी आहे की त्यांनी तुम्ही जिथे थांबला आहात, तिथून पुढे वाटचाल करावी.” भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगेल.
फिटनेस कायम राखण्याचे आणि सातत्य राखण्याचे आवाहन
टी-२० संघातील खेळाडूंना गौतम गंभीर यांनी आगामी मालिकेसाठी तंदुरुस्ती कायम ठेवण्याचा सल्ला दिला. डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील मालिकेसाठी खेळाडूंनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले. गौतम गंभीर म्हणाले की, “आपण सातत्याने सुधारणा करत राहू, याची खात्री करणे आवश्यक आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पुरेसा टी-२० क्रिकेट खेळत नाही, हे आपल्याला माहीत आहे. आता आपल्याला एक महिन्याची विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहून आगामी सामन्यासाठी तयार असणे गरजेचे आहे.”
एका दिवसाच्या तयारीत मिळालेले यश
क्रिकेट विश्वात कोणत्याही मोठ्या दौऱ्यावर जाताना सरावसााठी पुरेसा वेळ मिळणे अपेक्षित असते. मात्र, या वेळी भारतीय संघपहिल्या सामन्याच्या आधी फक्त काही दिवस आधीच न्यूझीलंडमध्ये पोहोचला होता. त्यामुळे फक्त एक दिवस तयारीसाठी मिळाला असल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले. अशी मर्यादित विश्रांतीची वेळ आणि कमी वेळेत केलेली तयारी असूनही संघाने दौऱ्यावर विजयी पताका फडकवली.
आगामी दौऱ्याचे नियोजन
टी-२० मालिकेचा हा विजय भारतीय संघासाठी खूप प्रोत्साहन देणारा ठरला आहे. आता एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमधील खेळाडूंवर पुढील जबाबदारी आलेली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिका संपल्यानंतर येणाऱ्या या आगामी सामन्यांनी संघाची क्षमता आणि फिटनेसची परीक्षा होणार आहे. गंभीर यांचे हे मार्गदर्शन खेळाडूंनी घेणारे आहे आणि ते पुढील मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज होतील याची खात्री या भाषणातून दिसून येते.










