नागपुर: नेपाळमध्ये सरकारने घातलेली सोशल मीडियावरील बंदी आता पुर्णपणे उलटली, असून देशात Gen Z आंदोलन किंवा झेंझी आंदोलन या नावाने ओळखला जाणारा हा तरूणांचा विद्रोह इतिहासात मोठा टप्पा मानला जातोय.
कशी झाली सुरूवात ५ सप्टेंबर २०२५ रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, यूटयूबं इन्स्टग्राम, X पूर्वीचे ट्विटर, यांसारख्या २६ प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदि जाहीर केल. सरकारच्या मते, सामाजीक सौहार्द बिघडवणारी माहिती रोखणे हा हेतू होता. मात्र, तरूण वर्गाने याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा मानून रस्त्यावर उतरले.
तरूणांचा उद्रेक आणि हिंसक वळन Hami Nepal सारख्या अपराजकीय तरूण संघटनांनी देशभर आंदोलनाचा ध्वज उचलला. काठमांडूच्या मैतीघर, मण्डला, फेडरल संसद भवन, तसेच पोखरा, बिराटनगर, बुटवल अशा शहरांमध्ये हजारो तरूणांनी एकत्र येऊन मोर्चे, नीदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि रबरच्या गोळ्यांचा वापर केला. यात सुमारे १९ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले.
राजकीय भूकंप: पंतप्रधानांचा राजीनामा या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. गृहमंत्री रमेश लेखक यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पायउतारून झाले. सोशल मिडीया बंदी मागे घेण्यात आली. कर्फ्यू लागू करण्यात आला असून सैन्याने अनेक भागांमध्ये तळ ठोकला आहे.
तरूणांचा आवाज – राजकीय नवजागृती या आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता. कोणताही झेंडा नाही, फक्त आवाज या घोषणेसह तरूणांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं. काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून सांगितल की, हे केवळ सोशल मीडियासाठी नाही, तर नव्या नेपाळसाठी नसून भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि दडपशाहीविरोधातील व्यापक संघर्ष आहे नेपाळच्या राजकारणात हे आंदोलन एक नवीन क्रांतिकारी ठरत आहे.










