नागपूर : भाजप एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्रचे माजी राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती झाले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने सी.पी.राधाकृष्णन यांना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे महाविकास आगाडीने बी.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. अखेर, झालेल्या मतदानानंतर सी.पी.राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
एनडी आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ७५२ वैध मतांपैकी भाजप उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे, त्यांचा विजय झाला झाला असून महाविकास आगाडीचे उमेदवार बी.सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं पडली आहेत. भाजप उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले आहे.
वैयक्तिक जीवन
चंद्रपूरम पोंनुसामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूमधील तिरुपूर येथे सी. के. पोंनुसामी आणि के. जानकी यांच्या घरी झाला. तरुणपणी ते टेबल टेनिस स्पर्धेत महाविद्यालयीन विजेते होते. त्यांनी तुतिकोरिनमधील व्ही. ओ. चिदंबरम कॉलेजमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवी घेतली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व नंतर जनसंघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. २५ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचा विवाह आर. सुमती यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले आहेत. ते लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य आहेत आणि क्रिकेट, व्हॉलीबॉलची आव आहे.
राजकीय कारकिर्द
१९७४ मध्ये ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीत निवडले गेले. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. आणि ते अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय झाले. १९९८ मध्ये त्यांनी कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. त्यांनी द्रमुकचे उमेदवार एम. रामनाथन यांचा पराभव केला. तिथून राधाकृष्णन १९९९ मध्ये पुन्हा निवडून आले. मात्र २००४ मध्ये त्यांचा पराभव झाला. २०१४ व २०१९ मध्ये मात्र त्यांना कोइंबतूरमधून निवडणूकात अपयश आले.
२००३ ते २००६ दरम्यान ते भाजप तामिळनाडूचे राज्याध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणून त्यांनी ९३ दिवसांची रथयात्रा काढली. या प्रवासात त्यांनी नद्यांची जोडणी, अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि दहशतवादविरोधात प्रचार केला.
२००३ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये संघाच्या स्वयंसेवकावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन करत न्यायालयीन अटक स्वीकारली.
राज्यपालपदाची कारकीर्द (२०२३-२०२५)
१) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालापदी नियुक्ती जाहीर केली. १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. १९ मार्च २०२४ रोजी तामिळसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल यांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
२) २७ जुलै २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.
२०२५ः उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
१७ ऑगस्ट २०२५ला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राधाकृष्णन यांची उपराष्ट्पतिपदासाठी उमेदवारी जाहीर केली.










