सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होणारे स्पर्धक कोणत्या प्रकारचे कपडे घालतात, याकडे फॅशन जगताचे नेहमीच बारीक लक्ष लागलेले असते. साधारणपणे बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या कपड्यांचीच चर्चा रंगताना दिसते. मात्र, नुकत्याच व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत युगांडाची स्पर्धक ‘एले हिने’ (Trivia Elle Muhoza) हिने घातलेल्या एका अनोख्या गाऊनने केवळ फॅशन विश्वाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मिस वर्ल्डच्या ‘वर्ल्ड डिझायनर अवॉर्ड’ कार्यक्रमात तिने परिधान केलेल्या आणि कमालीच्या गाजलेल्या या गाऊनला ‘लेअर्स ऑफ लाईफ'(Layers of Life) असे नाव देण्यात आले असून त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.
सिझेरियन प्रसूतीच्या ७ थरांची रंगांमधील हुबेहूब प्रतिकृती
हा गाऊन केवळ एक सुंदर पोषाख नसून, त्यामागे मातृत्व आणि विज्ञानाचा एक थक्क करणारा संदेश लपलेला आहे. जेव्हा सिझेरियनद्वारे (C-Section) बाळाचा जन्म होतो, तेव्हा डॉक्टरांना एका स्त्रीच्या शरीराचे सात थर कापून बाळाला बाहेर काढावे लागते. यामध्ये स्त्रीची त्वचा, त्याखालचा चरबीचा थर, फॅशिया (उती), पोटाचे स्नायू, पेरीटोनियम, गर्भाशय आणि शेवटी बाळाभोवती असलेली ॲम्निओटिक सॅक यांचा समावेश होतो. एका बाळाला जन्म देण्यासाठी स्त्रीला किती असह्य वेदनांमधून जावे
लागते, हे दाखवण्यासाठी यात पांढरा, पिवळा, गुलाबी आणि लाल अशा रंगांच्या छटांचा वापर करून त्या थरांची हुबेहूब प्रतिकृती कापडावर साकारण्यात आली आहे.
डिझायनर कीशा अब्दाल्लाची संकल्पना आणि जागतिक विचार
या अद्भुत गाऊनची निर्मिती युगांडाची जागतिक कीर्तीची डिझायनर कीशा अब्दाल्ला (Keesha Abdallah) हिने केली आहे. विशेष म्हणजे कीशाने नुकताच एका बाळाला जन्म दिला असून, स्वतः गरोदर असताना सिझेरियनची माहिती घेत असताना तिला ही संकल्पना सुचली होती. फक्त वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात दिसणारे शरीराचे सात थर तिने फॅशनच्या माध्यमातून जगासमोर आणले. कीशाच्या मते, हा गाऊन केवळ एका विशिष्ट देशापुरता किंवा वंशापुरता मर्यादित नसून, बाळाला जन्म देण्याचा अनुभव घेतलेल्या जगभरातील सर्व स्त्रियांना एकाच भावनिक धाग्यात जोडणारा एक जागतिक आविष्कार आहे.
सिझेरियन प्रसूतीबद्दलचा समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
सामान्यतः फॅशन ही नेहमी चकचकीत आणि झगमगीत असते असा लोकांचा समज असतो, मात्र एका डिझायनरचा विचार प्रत्यक्ष मानवी अनुभवाशी कसा जोडला जाऊ शकतो, हे या निमित्ताने दिसून आले. समाजात असा एक मोठा गैरसमज आहे की स्त्रिया प्रसूतीची वेदना सहन करू शकत नाहीत म्हणून सिझेरियनचा पळवाट म्हणून वापर करतात. मात्र, सिझेरियन हा कोणताही सोपा मार्ग नसून त्यात किती मोठी गुंतागुंत, जोखीम आणि वेदना समाविष्ट असतात, हे या गाऊनच्या माध्यमातून अतिशय संवेदनशीलपणे