Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या ४६ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना आमदार नितीन राऊत, ॲड. कृष्णा इंगळे, प्रा. जावेद पाशा व इतर मान्यवर.

नागपूर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन कुसूमताई वानखेडे, भवन येथे पार पडले. या एकदिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष ॲड. कृष्णा इंगळे, उद्घाटक माजी मंत्री आमदार नितीन राऊत, प्रसिद्ध संविधान विशेषज्ञ देविदास घोडेस्वार, विचारवंत प्रा. जावेद पाशा, अधिवक्ता ॲड. विक्रम मारपकवार, सचिव शरद तांबे, सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, गणेश मडावी, सुमित भुईगळ, बी.डी. धुरंधर, सतिष कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दरम्यान प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्ल्यार्पण करण्यात आले.

Read Also: नागपूर पदवीधर निवडणूक २३ ला मतदान, २७ ला मतमोजणी; प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात!

संघटेनेच्या पाठीमागे खंभीरपणे उभा राहील – आमदार नितीन राऊत

अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी नितीन राऊत मार्गदर्शन करताना

आमदार नितीन राऊत म्हणाले, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची ४६ वर्षाची वाटचाल यशस्वी राहिली आहे. संघटनेने या काळात हजारो कर्मचाऱ्यांना अधिकार प्राप्त करून देत न्याय मिळवून दिला आहे. कृष्णा इंगळे यांनी संघटनेला दिशा दाखवली आहे. तरीही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. या प्रश्नी मी वारंवार विधीमंडळात आवाज उठवला आहे. आता गरज पडल्यास रस्त्यावरून उतरून लढाई करण्याची वेळ आली तर ती लढू. मी संघटनेच्या पाठीमागे खंभीरपणे उभा राहील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

कास्ट्राईबमध्ये फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार – प्रा. जावेद पाशा

जावेद पाशा अधिवेशनात मार्गदर्शन करताना

याप्रसंगी जावेद पाशा यांनी सडेतोड विचार मांडले. ते म्हणाले, संघटना केवळ लोकांची संघटना नसावी. तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे विचार देणारी एक शक्ती असावी. कास्ट्राईब मागच्या ४६ वर्षांपासून फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार केंद्रित ठेवून काम करत आहे आणि सर्व घटकांतील कर्मचाऱ्यांना न्याय देत आहे. मुघल काळात आपले प्रतिनिधित्व नव्हते, पेशवाईत आपले प्रतिनिधित्व नव्हते तसेच ब्रिटीश राजवटीत आपले प्रतिनिधित्व नव्हते. मात्र बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केली आणि देशातील सर्व स्तरांतील नागरिकांना प्रतिनिधित्व प्राप्त करून दिले. त्यातून खऱ्या स्वरूपात देश निर्माण झाला. त्यामुळेच आपण आज वेगवेगळ्या पदांवर बसलो आहोत, असे सांगत फुले-शाहू-आंबेडकर विचार त्यांनी मांडला.

राज्यभरातील ३३ संघटनांचा सहभाग
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेशी राज्यभरातील विविध विभागातील कर्मचारी संघटना जुळलेल्या आहेत. राज्यभरातील जवळपास ३३ संघटनांचा नागपुरातील राज्यस्तरीय अधिवेशनात सहभाग होता. यामध्ये संघटनेचे राज्य कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

कर्तृत्वान कर्मचाऱ्यांचा सन्मान

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संघटनेतील सदस्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अरूण क्षिरसागर, डॉ. सचिन कुलसंगे, आसिफ खान पठाण, विभुतीचंद्र गजभिये, सतिष कांबळे, सत्यवान करधुरगे, दिपक बनसोडे, सनी माने, नागरत्न कांबळे, योगेश अडळमुळे, संजय उईके, रोहित पावरा, किशोर सोंगते, गोविंद वैद्य, छाया जाधव, कल्याण श्रवास्ती, रूपाली शेंगडे, संगिता दुधे, अमृता डोंगरे, मनोज निकम, नाक्षल धनवै, नामदेव बनसोड, लक्ष्मण वानखेडे, डॉ. दिवाकर नारनवरे, आशिष चक्रवर्ती, रामराव मगर, विशाल प्रधान, मायादेवी गायकवाड, सिद्धेश्वर मुंडे, सविता नुडे, प्रदीप इंगळे, विनायक भालेवार, अशोक गायकवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ॲड. कृष्णा यांचा देखील संघटनेने गौरवपत्र वाचन करित जाहीर सत्कार केला.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद तांबे यांनी केले. तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा ठराव प्रभाकर सोनडवले यांनी मांडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सोनडवले, डॉ. विभुती चंद्रगजभिये, नरेंद्र धनविजय, जालंधर गजघारे, विनोद गजभिये, राजरत्न इंगळे, राजकुमार रंगारी, डॉ. सोहन चौरे, डॉ. सुभाष गायकवाड, परशराम गोंडाणे, आर.एम. कांबळे, राकेश कांबळे, विनोद गायकवाड, दिनेश सुखदेवे, वर्षा इंगळे, सुनिता गिरी, अविनाश इंगळे, निरंजन वासे, निरंजन पाटील, देविदास हेलोडे, अरविंद ग्याबरीयल, अशोक राऊत, मनोज निकोसे, मिलिंद मेश्राम, प्रमोद रामटेके, सत्यवान खांडेकर, मुन्ना मेश्राम, सुधाकर सोमकुवर, मिलिंद रामटेके, दिलीप पाटील, रत्मसिंह बाबरी, अनिरूद्ध खडसे, राहूल सरदार, संजय खडोदे, चंद्रकांत जोगदंडे, भुपेंद्र बंदेलवार, शरद तांबे, राहूल सूर्यवंशी, शालिनी गवई, सुनिल विघ्ने, नितीन इंगोले, संदीप पाखरे, संजय भाबड, शोभा मडके, प्रविण भांगडे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

Read Also: शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर! ‘नमो’च्या हप्त्यांची प्रतीक्षा, दुष्काळाच्या झळा; सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे