Home City post महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर जिल्ह्याचे अधिवेशन संपन्न

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर जिल्ह्याचे अधिवेशन संपन्न

नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर शहर जिल्ह्याचे वार्षिक अधिवेशन  नागपूर येथे यशस्वीपणे पार पडले. शिक्षक संघटनेच्या या महत्त्वपूर्ण अधिवेशनात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या अधिवेशनास नागपूर शहरातील विविध शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी पाटील यांनी भूषविले. यावेळी शिक्षकांच्या अडचणी, समस्या तसेच शैक्षणिक धोरणांबाबत विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक   मा. श्री. प्रवीणजी दटके (आमदार मध्य नागपूर),  स्वागताध्यक्ष मा. श्री. सुधाकर कोहळे, (माजी आमदार), प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. अनिलजी सोले (माजी आमदार), मा. श्री. नागोजी गाणार  (माजी शिक्षक आमदार) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका मांडत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अधिवेशनाच्या शेवटी शिक्षक संघटनेच्या वतीने विविध ठराव मंजूर करण्यात आले. या अधिवेशनामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.