Home City post सृजन लोकविकास संस्था व अन्विती फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम; पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला मोठा...

सृजन लोकविकास संस्था व अन्विती फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम; पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला मोठा संदेश

नागपूर : ‘विजिलन्स अवेअरनेस वीक’ निमित्त सृजन लोकविकास संस्था आणि अन्विती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड (CMPDI) च्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांकडून प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. हे सादरीकरण ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जरीपटका येथील दयानंद आर्य पार्कमध्ये पार पडले. या नाटकात सृजन लोकविकास लर्निंग सेंटरमधील आर्थिकदृष्ट्या मागासीत वर्गातील ८ विद्यार्थ्यांसह सुरेंद्रगड नगर परिषद शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण १५ विद्यार्थी कलाकारांनी एकत्र येत समाजातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचा संदेश देत नागरिकांना भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

पथनाट्य ही जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. या पथनाट्यातून प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे तर विचार करायला भाग पाडणारा सामाजिक संदेश देण्यात आला. या सादरीकरणाद्वारे सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविण्याबरोबरच पारदर्शक, जबाबदार समाजाची निर्मिती करण्याचा संकल्पही दृढ करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी CMPDI तसेच सृजन लोकविकास संस्था व अन्विती फाऊंडेशन या दोन्ही संस्थांचे एकत्रित प्रयत्न हे कॉर्पोरेट, शिक्षणसंस्था आणि समाज यांच्या सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामायण प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संजय सराफ उपस्थित होते. तसेच सृजन लोकविकास संस्थेच्या प्रमुख डॉ. शलिनी हेडाऊ, अन्विती फाऊंडेशनट्या च्या प्रमुख श्रीमती शेफाली दूधबडे, सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेडचे प्रादेशिक संचालक श्री. दुपट्टावाला , तसेच सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेडचे विभागप्रमुख श्री. शांतनू शर्मा आणि तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य श्री. धुर्वे उपस्थित होते.

सर्व उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे समाजात प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांची जपणूक होत असल्याचे मत व्यक्त केले.