Home City post स्वातंत्र्यदिनी वारकरी मंच आणि विठ्ठल मंदिराच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक राष्ट्रगीत

स्वातंत्र्यदिनी वारकरी मंच आणि विठ्ठल मंदिराच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक राष्ट्रगीत

नागपूर – देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वारकरी मंच, महाराष्ट्र राज्य, नागपुर शहर आणि श्री परब्रम्ह विठ्ठल रखुमाई हनुमान शीतला माता मंदिर आणि एक वादळं भारताच यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राष्ट्रध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

“एक वादळं भारताचं” या घोषवाक्यासह झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी राष्ट्रध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थित सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी एकत्रितपणे सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. तिरंग्याला मानवंदना देत संपूर्ण परिसर “भारत माता की जय” घोषणांनी दुमदुमून गेला. या प्रसंगी वारकरी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे विश्वस्त सचिव तुळशीरामजी पिंपळघरे आणि मार्गदर्शन विश्वस्त अध्यक्ष ज्ञानेश्वरजी टोंगे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारकरी मंच नागपुर शहर पदाधिकारी मनीष ठवकर, प्रसाद मांडवगडे, अमेय कुलकर्णी, टीम विठ्ठल चे मेहुल बेले, रोहित बुधे, रिद्धीश सावरकर , टीम रामा पदाधिकारी सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी देशातील जवान आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीम विठ्ठल पदाधिकारी मानस रोडे व आभारप्रदर्शन नागपूर जिल्हा अध्यक्ष मयुर गीता रामदास वाजगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.