मुंबई : जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan tata) यांचे निधन झाले आहे. भारताच्या उद्योगजगताचा तारा आज निखळला. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जाणे भारतीय उद्योगजगतालाच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी दुख:दायक आहे.
रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. काल मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.
आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर रतन टाटा काय म्हणाले होते?
सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते.;आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
रतन टाटा यांच्याविषयी…
टाटा यांनी मार्च १९९१ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि २८ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा महसूल अनेक पटींनी वाढला. हा महसूल १९९१ मध्ये फक्त १०,००० कोटी रुपयांच्या उलाढालीवरून २०११-१२ मध्ये US$१००.०९ अब्ज इतका वाढला. २००० मध्ये टाटा टी कडून US$450 दशलक्ष मध्ये टेटली, २००७ मध्ये £६.२ बिलियन मध्ये टाटा स्टील कडून पोलाद निर्माता कोरस आणि २००८ मध्ये £२.३ बिलियन मध्ये टाटा मोटर्स यासह काही महत्त्वपूर्ण संपादनांद्वारे त्यांनी समूहाचे नेतृत्व केले. यूएस डॉलर्समध्ये ऐतिहासिक जग्वार लँडचा समावेश आहे. निवृत्तीनंतर टाटा यांना त्यांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्याशी बोर्डरूम युद्धाचा सामना करावा लागला. ज्यांना २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले. मिस्त्री यांना हटवल्यानंतर ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून परत आले आणि जानेवारी २०१७ मध्ये समूहाचे नेतृत्व एन. चंद्रशेखरन आणि टाटा सन्सच्या मानद अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली.








