आज १० ऑक्टोबर गुरुवार असून नवरात्रीची आठवी माळ आहे. त्यामुळे महागौरीची सर्वांवर कृपा राहिल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?
मेष – आज निवांत वेळ मिळेल परंतु एकटेपणा जाणवू शकतो. थोडक्यात अस्वस्थ मन देखील राहू शकते.
वृषभ – परिवारासह दूरचा प्रवास होऊ शकतो. कदाचित कुलदेवतेची यात्रा संभवेल. उत्तम वाहन सुख लाभेल.
मिथून – नोकरी/व्यवसायाची अडलेली सर्व कामे नियमित पार पडतील. घरातून पूर्ण मदत मिळण्याची शक्यता. व्यवसायाच्या ठिकाणी काही विशेष बदल दिसू शकतो.
कर्क – दिलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. विशेष करून मित्र किंवा चुलत्यांकडून दिलेले पैसे वापस मिळतील किंवा त्यांच्याकडून काही लाभही होण्याची शक्यता.
सिंह – आज महत्त्वाचे निर्णय टाळावेत. विशेष करून प्रवासासंदर्भातील असेल तर निश्चीतच टाळावा.
कन्या – आज राजकारणा संदर्भात काहीही निर्णय घेऊ नये. व्यवसायात काही अडचणी येण्याची संभावना आहे.
तूळ – स्नेही लोकांची भेट होऊ शकते. स्नेही लोकांसाठी खरेदी करा. आज कुटुंबातील लोकांसमवेत आनंद साजरा करा.
वृश्चिक – मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे कदाचित आरोग्य संदर्भातील तक्रारी जाणवतील. काही ठिकाणी व्यर्थ चिंता होईल.
धनु – घरासाठी तुम्ही कष्टपूर्वक जे कार्य करीत आहात त्याचे योग्य फल मिळण्याचा दिवस आहे.
मकर – आज कुटुंबांसाठी वेळ द्याल. मुलांसाठी किंवा घरातील आपल्या स्नेही व्यक्तीसाठी विशेष खरेदी करा.
कुंभ – सध्या आपली उर्जा किंवा आपण केलेली मेहनत अर्थात जे काही आपण नवीन कार्य केलेले आहे ते जगाला दाखवू नका योग्य वेळ येताच ते प्रगट करा.
मीन – साधारण दिवस असेल अर्थात अधिक नफा ही होणार नाही किंवा अधिक नुकसान पण दिसणार नाही.










