Home महाराष्ट्र पोस्ट नयनतारा साठी झुंजला छोटा मटका, आता बल्ली व वीरभद्रा घेणार जागा?

नयनतारा साठी झुंजला छोटा मटका, आता बल्ली व वीरभद्रा घेणार जागा?

नागपुर : एकेकाळी ताडोबाच्या कोअर व बफर जंगलाचा संम्राट ठरलेला छोटा मटका नामक वाघ आज जखमी अवस्थेत जेरबंद आहे. छोटा मटका नैसर्गिक अधिवासात येण्याची आशा धूसम झाल्याने त्याचे रीकामे झालेले सिंहासन आता बल्ली आणि वीरभद्र हे नवे सरदार बळकावू पाहत आहेत.

बल्ली व वीरभद्रा नामक वाघांचे आगमन

खडसंगी बफर वनपरिक्षेत्रातील निमढेला, रामदेगी, जोगामोगा, झरण आणि अलिझंजा या विस्तीर्ण पट्यात छोटा नयनतारा वाघिणीसाठी छोटा मटका व ब्रम्हा या दोन वाघात बौद्ध पोर्णिमेला थरारक झुंज झाली होती. यात ब्रम्हा वाघ ठार झाला तर छोटा मटका गंभीर जखमी झाला होता. जंगलाला थरकाप उडवणाऱ्या या संघर्षानंतर छोटा मटका जखमी अवस्थेत एक महिना विव्हळत रीहिला. मात्र, वनाधिकाऱ्यांनी त्याची तेवढी दखल घेतली नाही. अखरे स्वतः न्यायालयाने जखमी छोटा मटकाची दखल घेत वनविभागाला त्याच्यावर उपचार करण्याचा आदेश दिला. यानंतर वनविभाने छेटा मटका चंद्रपूर वन केंद्रात उपचार घेत आहे., अर्थात झुंजीत त्याच्या पायाची हाडे तुटल्याने पुन्हा तो पूर्ववत बळकट होईल की नाही, याबाबत पशुवैद्धकीय तज्ञ्ज्ञही संभ्रमात आहेत. परीणामी, छोटा मटका पुन्हा जंगलात परतेल की कायम कैदेत राहील, हा प्रश्न कायम आहे. याच दरम्यान, छोटा मटका नसल्याने त्याच्या राज्यात बल्ली व वीरभद्रा नामक वाघांचे आगमन झाले आहे. या दोन नव्या वाघांनी छोटा मटकाच्या अधिवासावर पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ताडोबातील अधिराज्य संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

मोगली, बजरंग ब्रम्हासोबत लढला!

१ छोटा मटका आतापर्यंत मोगली, बजरंग व ब्रम्हा अशा अनेक वाघांसोबत लढला आणि जिंकला.

२ त्याने सुरूवातीला २०२१ मध्ये वयाने मोठा असलेल्या मोगलीला जमीन दाखवली.

३ त्यानंतर २०२३ मध्ये तोपर्यंत अपराजित असलेल्या बजरंगला यमसदनी धाडले, तर २०२५ मध्ये छोटा मटकाने ब्रम्हाला पराभूत केले. मात्र, या लढाईत छोटा मटका स्वतःही गंभीर जखमी झाला.