Home महाराष्ट्र पोस्ट Congress candidates list: काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विद्यमान आमदारांना पुन्हा...

Congress candidates list: काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विद्यमान आमदारांना पुन्हा संधी!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. यातच, महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची फार उत्सुकता लागली होती. आता त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असून पहिल्या उमेदवारी यादीमध्ये ४८ उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास विलंब झाला. अजूनही अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी!

धारावीतून वर्षा गायकवाड यांच्या भगिणी डॉक्टर ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माजी मंत्री नसीम खान यांना चांदीवलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिथे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दिलीप लांडे यांचे आव्हान असणार.

काँग्रेसच्या यादीत कुणाला कुठून संधी?

१) के.सी. पाडवी, अक्कलकुवा
२) राजेंद्र गावित, शहादा
३) किरण दामोदर, नंदुरबार
४) शिरीशकुमार नाईक, नवापूर
५) प्रवीण चौरे, साक्री
६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
७) धनंजय चौधरी, रावेर
८) राजेश एकाडे, मलकापूर
९) राहुल बोंद्रे, चिखली
१०) अमित झनक, रिसोड
११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
१२) सुनील देशमुख, अमरावती<br>१३) यशोमती ठाकूर, तिवसा
१४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
१५) रणजीत कांबळे, देवळी
१६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
१७) बंटी शेळके, नागपूर, मध्य
१८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
१९) नितीन राऊत, नागपूर उत्तर
२०) नाना पटोले, साकोली
२१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया
२२) सुभाष धोटे, राजुरा
२३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
२४) सतीश वारजुकर, चिमूर
२५) माधवराव पवार-पाटील, हदगाव
२६) तिरुपती कोंडेकर, भोकर
२७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव
२८) सुरेश वरपुडकर, पाथरी
२९) विलास औताडे, फुलंब्री
३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम
३२) नसीम खान, चांदिवली
३३) ज्योती गायकवाड, धारावी
३४) अमिन पटेल, मुंबादेवी
३५) संजय जगताप, पुरंदर
३६) संग्राम थोपटे, भोर
३७) रवींद्र धंगेकर, कसबा
३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर
३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी
४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
४१) अमित देशमुख, लातूर, शहर
४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण
४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
४५) राहुल पाटील, करवीर
४६) राजू आवळे, हातकणंगले
४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
४८) विक्रमसिंग सावंत, जत