नागपुरः समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर करून लुटण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, समृद्धी माहामार्गावर चोरट्यांनी खिळे टाकले नाहीत किंवा कोणताही घातपात घडवण्याचा कट नसून एक वेगळचं कारण पुढे आलं आहे.
समृद्धीवर माळीवाडा इंटरचेंज छत्रपती संभाजीनगर येथे दौलताबाद पोलिसांच्या हद्दीत मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीकडुन दुरूस्तीचे काम सुरू होते. याअंतर्गत काँक्रीट रस्त्यावरील बारीक भेगांमध्ये इंजेक्शनने मिश्रण टाकण्यासाठी नोझल लावले होते. समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज छत्रपती संभाजीनगर येथे दौलताबाद पोलिसांच्या हद्दीत मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीकडुन महामार्गावरील दुरूस्तीचे काम सुरू होते. समृद्धी महामार्गावर सिमेंट रस्त्याच्या बारीक भेगा इपॉक्सी ग्राउटिंग तंत्राचे इंजेक्शनद्वारा बुजविण्यात येत होते.
नेमके काय घडले? प्रवाशांनी काम सुरू असलेल्या भागातून वाहने घातल्याने चार कार पंक्चर झाल्या. मंगळवारी रात्री जालन्यातून पनवेलला जाणारे संतोश सानप यांनी व्हिडीओ तयार केला. पुलावर खिळे ठोकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोंडी झाली. दौलताबाद पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
काम पुर्ण, खिळे काढले हा चोरीचा प्रकार नाही. एमएसआरडीसीच्या वतीने देखभालीचे काम सुरू आहे. याबाबत पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. महामार्ग देखभालीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारी रस्त्यावरील नोझल काढले.
पुर्व कल्पना दिली का? काम सुरू असल्याच्या २०० मीटर आधी ब्लिंकर्स लाइट व संदेशाचे बोर्ड लावणे गरजेचे आहे. ते न केल्यानेच असा प्रकार झाल्याचे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. फलक न लावल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल. रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता संगीता जैस्वाल व अधीक्षक अभियंता सतीश श्रावगे यांनी ही माहिती दिली.










