नागपूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघाती निधनाची बातमी पसरली. परंतु प्रथम त्यावर अनेकांना विश्वासच बसला नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सहभागी झाले आणि त्याना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. नागपुरात उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘विजयगड’ हे नविन निवास्थान तयार करण्यात आले. हा बंगला, येथील उद्यानही त्यांना फारच आवडले होते. स्वच्छतेसाठी ते फारच आग्रही असायचे. विजयगड बंगल्यातील वस्तूही त्यांना पसंत होत्या. मी येणार आहे. सर्व वस्तू तशाच ठेवा’, अशा सुचना त्यांनी जातांना कर्मचाऱ्यांना केल्या होत्या.
या आठवनींना कर्मचाऱ्यांनी उजाळा दिला. डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बांधकाम विभाकडून अजितदादांचा बंगला तयार करण्यात आला शाखा अभियंता राजेंद्र बारई यांच्याकडे त्याची जबादारी होती. बारई म्हणाले, बंगला तयार करताना त्यांच्याकडून काही सूचना होत्या. बंगल्यावर त्यांचे नाव दिले होते. परंतु ते त्यांनी बदलून घेतले. येथील उद्यानही त्यांना आवडले होते. फुलझाडांची काळजी घ्यायचे. फुलदाणीमधील झाडांकडे त्यांचे लक्ष असायचे. या फुलदाणींमधील मीतीत बो़ट टाकुन त्यातील ओलसरपणा बघायचे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आतील सर्व जागेचे फोटो काढले होते. त्यांना सर्व वस्तू तिथेच हव्या होत्या. ‘मी येणार असून वस्तू तशाच ठेवायच्या’, अशा सूचना केल्या होत्या.
वेळेचे पक्के! बंगल्यातील कर्मचारी विश्वास खडसे व निरज पाटील यांनी सांगीतले की, दादा सकळी सहा वाजता तयार व्हायचे व आलेल्यांची भेट घ्यायचे. वेळेचे पक्के होते. भेटणाऱ्यांनी सांगितलेल्या कामांचा मागोवा घेण्यास सांगत असे. जे होणार नाही, त्याबबत स्षष्टच सांगायचे. उद्यानाची काळजी घेणाच्या सूचना त्यांच्या होत्या. ते येण्यापूर्वीच त्यांचे जेवण करणारा यायचा, असे त्यांना सांगितले.










