Home क्राईम पोस्ट प्रेमसंबधातुन तरुणीची फेटरीतील ओयो हॉटेलमध्ये चाकूु खुपसून हत्या

प्रेमसंबधातुन तरुणीची फेटरीतील ओयो हॉटेलमध्ये चाकूु खुपसून हत्या

कळमेश्वर : नागपुर-कळमेश्वर  मार्गावरील फेटरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये तरुणीची चाकु खुपसुन हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी असुन,  (दि.२३) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तिची हत्या प्रेमसंबधातून करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला असुन, कळमेश्वर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. रुचिता राजेश भांगे (२१ रा. शिवमंदीरजवळ, वेलकम सोसायटी, जुनी वस्ती बोरगाव गिट्टीखदान) असे मृत तरुणीचे तर स़ौरभ ऊर्फ बिट्टु जामगडे ( २५, रा. आष्टी, ता. नागपूर ग्रामीण)  असे फरार आरोपीचे नाव आहे. रुचिता ही नागपूर शहरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये बीए अंतीम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिला

महाराष्ट्र पोलिस दलात भरती होण्याचे ध्येय अपुर्ण

तिला महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी करायची इच्छा असल्याने ती तयारी करीत होती. ती दुपारी २ वाजताच्या सुमारास घराबाहेर गेल्याची माहीती मिळताच वडीलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. ती पोलीस भरती सराव क्लासला आली नसल्याने मैत्रिणिने सांगताच कुटुंबीयांनी रात्री ११ वाजेपर्यत प्रतीक्षा केली आणि घरी न आल्याने नंतर ती  बेपत्ता असल्याचा तक्रार नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नोंदवली होती, दरम्यान, आयोगामधील कर्मचाऱ्याने शुक्रवारी सकाळी पोलीसांनी माहीती दिल्याने हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक-१०५ मधील बेडवर रुचिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडुन असल्याचे आढळुन आले. रजत शिंगणे याने या प्रकारची माहीती रुचिताचे वडील रमेश भांगे यांना दिली. मृत रुचिता व आरोपी सौरभ ओयो

 दोघांचीही वाहने हॉटेलसमोर

ओयो हॉटेलमध्ये त्यांच्या वाहनांनी आले होते. त्या दोघांचीही वाहने शुक्रवार सकाळपर्यत हॉटेलसमोरच होती.  हत्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली आणि आरोपी त्याचे वाहन सोडुन पळुन गेला. तो हॉटेलबाहेर पडताना कुणालाही दिसला नाही. दोघांचीही वाहने उभी असल्याने तसेच खोलीचे दार बंद असल्याने ओयो कर्मऱ्यांना रात्रभर शंका आली नाही. ते बाहेर न आल्याने कर्मचाऱ्याने दार ढकलले आणि हा प्रकार उघड झाला.