Home Sports news आंतरराष्ट्रिय कराटे रंगमंचावर नागपूरची हेताक्षी वाटकर चमकली

आंतरराष्ट्रिय कराटे रंगमंचावर नागपूरची हेताक्षी वाटकर चमकली

नागपूर – कॉम्बॅट मार्शल आर्ट असोसिएशन तर्फे (CMAA) फोर्थ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती.  6 ते 17 वर्षे वयोगटात दत्तवाडी येथील ज्ञान विद्या मंदिरच्या इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी हेताक्षी विशाल वाटकर हिने उल्लेखनीय कामगिरी करीत एक सुवर्ण पदक आणि एक रजत पदक पटकावले.

हेताक्षी ने तिच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक “यश इंगळे” व पालकांना दिले आहे तसेच सर्व कुटुंबांनी आणि मित्रमंडळानी तिचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.