आजपासून श्रावणमासाला सुरुवात; तर जाणून घ्या आजच्या राशित नेमकं काय?

दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, त्यामुळे आज आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. त्यासाठी जाणून घ्या आपल्या राशित आज काय?

मेष (Aries) : आजच्या दिवशी आराम करा अन्यथा समस्या उद्धभू शकतात. सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते.

वृषभ (Taurus) : आजच्या दिवशी अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता. तसेच नोकरी, व्यवसायात लाभ मिळू शकते. दिवस चांगला आहे.

मिथुन (Gemini) : आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होऊ शकते. जोडीदारासोबत दिवस चांगला जाण्याची शक्यता.

कर्क (Cancer) : आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल अशी संभावना. दिवसाची सुरुवात ठिक राहणार नसून, इच्छा नसतानाही पैसे खर्च होण्याची शक्यता.

सिंह (Leo) : आजच्या दिवशी पैशांच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता. चांगल्या लोकांच्या संगतीमुळे फायदा होऊ शकतो.

कन्या (Virgo) : आजच्या दिवशी प्रगतीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. ऑफिसमध्ये काही लोक गुप्तपणे तुमची मदत करतील अशी संभावना.

तूळ (Libra) : आज या राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. व्यवसायात नवीन योजना आखू शकता.

वृश्चिक (Scorpio) : आजच्या दिवशी गुंतवणूकीसाठी योजना आखू शकता. अचानक होणारी भेट फायद्याची ठरु शकते.

धनु (Sagittarius) : आजच्या दिवशी कामासंबंधी अडचणी कमी होऊ शकतात. अडकलेले काम पूर्ण होऊ शकते.

मकर (Capricorn) : आजच्या दिवशी आखलेल्या योजना फायदेशीर ठरु शकतात. वादाचे प्रसंग येऊ शकतात. मानसिक समस्या जाणवू शकतात.

कुंभ (Aquarius) : आजच्या दिवशी तब्येतीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : आजच्या दिवशी नोकरीत बढतीची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता.