Home क्राईम पोस्ट नागपूरच्या अनंतनगरात मध्यरात्री थरार! बुरखाधारी दरोडेखोरांचा ८२ वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला

नागपूरच्या अनंतनगरात मध्यरात्री थरार! बुरखाधारी दरोडेखोरांचा ८२ वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला

नागपूर : उपराजधानी नागपुरात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचे अत्यंत भयंकर उदाहरण समोर आले आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाफरनगर परिसरातील अनंतनगर (अहबाब कॉलनी) येथे गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची भीषण घटना घडली. चार अज्ञात बुरखाधारी आरोपींनी घरात घुसून एका ८२ वर्षीय वृद्ध महिला राफिया शरीफ यांच्यावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Also: २०१८ चे थरारक मौदा हत्याकांड: पत्नी-मुलाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाला दुहेरी जन्मठेप!

मुलगा बाहेर जाताच साधला डाव!

मिळालेल्या माहितीनुसार, जाफरनगर येथील अहबाब कॉलनीत ८२ वर्षीय राफिया शरीफ या त्यांचा मुलगा राजा शरीफ (वय ४०) यांच्यासोबत राहतात. सध्या त्यांच्या घरात बांधकामाचे काम सुरू आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुलगा राजा शरीफ हा काही कामानिमित्त मित्रांसोबत बाहेर गेला होता. घरात वृद्ध महिला एकट्याच असल्याचे पाहून तोंडाला रुमाल आणि बुरखा बांधलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरात घुसताच त्यांनी तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने राफिया यांच्यावर निर्घृण हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने वृद्ध महिला रक्तबंबाळ झाल्या.

सोन्याचे कंगन अन् चेन हिसकावून पसार

वृद्धेला मारहाण करून असहाय्य केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या हातातील सोन्याचे कंगन आणि गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. दरोडेखोर पळून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या राफिया यांनी कशाबशा हिमतीने घराबाहेर येऊन आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. काही वेळातच मुलगा राजा शरीफ घरी परतल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी; पोलिसांचे धागेडोरे हाती

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक आणि परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार: