Home City post शिक्षण विभागात गोलमाल, फक्त १७ जणच सुनावणीला सामोर

शिक्षण विभागात गोलमाल, फक्त १७ जणच सुनावणीला सामोर

नागपूर : नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राची प्रतिमाच काळवंडली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळाल्या, वेतनही सुरू झाले. एवढ्या गंभीर प्रकरणात २० अधिकारी, कर्मचारी व शाळा संचालकांवर गुन्हे दाखल झाले, तर ६३२ जण संशयितांच्या यादीत आहेत. शासनाने सुनावणीसाठी उपसंचालकांकडून कारवाई सुरू केली, पण आरोपीच्या पिंजऱ्यातील शिक्षकांची बेफिकीर वृत्ती उघड झाली.

पहिल्या दिवशी ५० जणांना हजर राहायचे होते, मात्र केवळ १७ जणच सुनावणीला सामोर आले. उर्वरितांनी उपस्थितीही नोंदवली नाही. रविनगर येथील डायटच्या कार्यालयात ही सुनावणी इन कॅमेरा घेण्यात येत आहे. समितीच्या सदस्यांकडून उपस्थितांना त्यांच्या नियुक्तीची तारीख, शिक्षण पद्धत, पगाराचे स्वरूप, पहिली शाळा आणि कार्यरत कालावधी यासंबंधी प्रश्न विचारले जात.

समिती एकच आहे

दोन समित्या नाहीत, एकच समिती आहे डायटच्या अधिकाऱ्यांना केवळ कागदपत्रांच्या तपासणीसाठी घेण्यात आले आहे. लवकर सुनावणी व्हावी म्हणून दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असली तरी समिती एकच आहे.

केवळ १७ जणच सुनावणीला सामोरे

पहिल्या दिवशी ५० शिक्षकांची सुनावणी अपेक्षित होती मात्र केवळ १७ जणांनीच उपस्थिती लावली. उर्वरित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुनावणीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सुनावणी इन कॅमेरा घेतली जात असून प्रत्येकाचे पूर्ण बयाण रेकॉर्ड केले जात आहे. नियुक्तीची तारीख, पहिली शाळा, पगार, कार्यकाळ यासंदर्भात तपशीलावर चौकशी केली जाते. सदस्य सचिव म्हणून डायटचे प्राचार्य व कर्मचारी नेमले गेल्याने त्यांच्या नियमित कामकाजावर प्रत्यक्ष परिणाम झाला आहे. त्यामुळे विभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प पडल्याचे दिसते.