नागपूर – सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबतचा ऐतिहासिक निर्णय अलीकडेच दिला आहे. त्या पाश्वर्भूमीवर नागपूर विभागीय कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी सादरीकरण करून झुडपी जंगला विषयी सविस्तर माहिती दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल होण्यासाठी गतीने कार्यवाही करण्यासह महत्वाचे निर्देश दिले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय आयुक्तालयातील महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.