नागपूर : शासकीय निवासस्थान रविभवन नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती दिनी आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदचे आयोजन करण्यात आले.
या परिषदेला राज्यातील 28 जिल्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षे पासून प्रलंबित असलेली प्रकरणे ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या कडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रविभवन येथे उपस्थित झाले.
यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे गाऱ्हाने ऍड. मेश्राम यांनी ऐकून घेतले असून पीडित पारधी बांधवांची सुमारे 156 प्रकरणे ही राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आले.
राज्यभरातून आलेल्या सर्व पीडित पारधी समाज बांधवांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या असता आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल केली सर्व प्रकरणे प्राथमिकतेने निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन ऍड. मेश्राम यांनी परिषदेला दिले. सदर प्रकरणे हाताळण्यास कुचकामीपणा करणाऱ्या दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफल देऊन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदचे आयोजन हे दोन सत्रात करण्यात आले असून पहिल्या सत्रात पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील पीडीत पारधी बांधवांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आहे होते. तर दुसऱ्या सत्रात विदर्भातील पीडित पारधी समाज बांधवसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या तक्रारी निवेदने आयोगाकडे दाखल करून घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने ऍड. धर्मपाल मेश्राम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र कोठेकर सामाजिक समाजचिंतक , आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त , उपायुक्त दिगंबर चव्हाण , प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार , आदिवासी सेवक तथा प्रांताध्यक्ष बबन गोरामन ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषद आयोजन व नियोजन हे आदिवासी सेवक तथा प्रांतध्यक्ष बबन गोरामन यांच्या नेतृत्वात आदिवासी पारधी विकास परिषदेने यशस्वीपणे केले असून कार्यक्रमाला राज्य महासचिव शिवलाल पवार, धर्मराज भोसले, जिल्हाध्यक्ष अनिल पवार , युवा अध्यक्ष अतिश पवार, उपाध्यक्ष सतीश माळी, शुभम पवार , निकेश माळी , प्रसिद्धी प्रमुख प्रशांत गोरामण यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनेचे देखील विशेष उपस्थिती दर्शवून समाजाच्या हितासाठी एकमंचावर आल्याचे समाधान आदिवासी सेवक तथा प्रांताध्यक्ष बबन गोरामण यांनी व्यक्त केले.