नागपूर – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना संगीतमय कार्यक्रमातून नागपुरातील कलावंतांनी श्रद्धांजली अर्पण केली. तराना म्यूझिकल अकॅडमी तर्फे आयोजिक कार्यक्रमात जवळपास 15 गायकांनी गाणे गायली. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्य् सुपरहिट गाण्यांच्या सादरीकरणामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना वाद्यांची साथ देणारे प्रसिद्ध कलाकार शाहमीर अली यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. तर देवीदास बांबोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तराना म्यूझिकल अकॅडमीचे संचालक शाहीद अली यांनी हिंदी मोरभवन या ठिकाणी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बाल गायिका संयुक्ता लोखंडे हिच गाणं मुख्य आकर्षण ठरलं. यासह सुकन्या लोखंडे, कांचन मेश्राम, शैलेश मठ्ठमवार, संयुक्त मोठघरे, जयश्री पाटील, अमोल लोखंडे, रवींद्र मनोहरे, अपर्णा अहिवले, अनामिका बडबोले, के. दिनेश प्रभाकर सोनडवले, शैलेश मेश्राम या गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमाचे संचालन पंकज पाटील यांनी केले. यांच्यासह स्नेहा चिकनकर, शारदा लांजेवार, रजत चिकनकर यांचे सहकार्य होते.