उद्या माळी समाजाचा परिचय मेळावा; महात्मा फुले सभागृहात आयोजन

नागपूर : माळी समाज उपवर वर-वधुंचा परिचय मेळावा उद्या बुधवारी दिनांक 25 तारखेला आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा देखील पार पडणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेकडून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा रेशीमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजताला पार पडणार आहे.

महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिबाग अंतर्गत दरवर्षी उपवर वर-वधू परिचय मेळावा समितीतर्फे माळी समाजातील उपवर युवक -युवतींचा परिचय मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाचा परिचय मेळावा देखील महात्मा फुले शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला आहे. उपवर वर-वधु परिचय मेळावा संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मोर्शी-वरूडचे आमदार चंदु यावलकर, बालरोग तज्ञ अभिलाषा गावतुरे, डॉ. पंकज राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने वर-वधु व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.