काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; ‘या’ १६ उमेदवारांना मिळाली संधी, बाबा सिद्दिकींच्या मतदारसंघातून कोण?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची एकामागून एक यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी रात्री उशीरा आपल्या १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.

दरम्यान, महाविकास आघाडीने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५- ८५ जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवून एकूण २५५ जागांसाठी जागावाटप निश्चित केले आहे. उर्वरित २३ जागांचे वाटप प्रत्येक पक्षाच्या उमेदवार याद्यांच्या आधारे ठरविण्यात येणार असल्याचे समजते.

अंधेरी पश्चिम मधून सचिन सावंत यांना उमेदवारी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर असून, या तिसऱ्या यादीत काँग्रेसने १६ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दिग्रस विधानसभा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या मतदारसंघातून असिफ झकारिया!

बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. याच मतदारसंघातून काँग्रेसने असिफ झकारिया यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. तर, कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना संधी मिळाली आहे.

काँग्रेसच्या १६ उमेदवारांची तिसरी यादी!

१) खामगाव- राणा दिलीपकुमार सानंदा

२) मेळघाट- डॉ. हेमंत नंदा चिमोटे

३) गडचिरोली- मनोहर तुळशीराम पोरेटी

४) दिग्रस – माणिकराव ठाकरे

५) नांदेड दक्षिण- मनोहर अंबाडे

६) देगलूर – निवृत्तीराव कांबळे

७) मुखेड- हनमंतराव पाटील

८) मालेगाव मध्य- एजाज बेग अली बेग

९) चांदवड- शिरीषकुमार कोतवाल

१०) इगतपुरी- लकीभाऊ जाधव

११) भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे

१२) अंधेरी पश्चिम- सचिन सावंत

१३) वांद्रे पश्चिम- असिफ झकारिया