शरद पवारांच्या NCP ची पहिली यादी जाहीर; काका-पुतण्याचा सामना, अजितदादांना युगेंद्र पवारांचे आव्हान!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून बारामती मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? या प्रश्नाचेही उत्तर मिळाले आहे. शरद पवार बारामतीत मोठा गेम खेळणार आहेत. शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण ४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, काल महाविकास आघाडीतील जागावाटप जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ६५ उमेदवारांची यादी कालच जाहीर केली आहे. आता काँग्रेसच्या यादीची प्रतिक्षा आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी यादी जाहीर केली. दुसरी यादी कदाचित उद्या अंतिम होईल. ती उद्या किंवा परवा घोषित होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार मैदानात!

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ४५ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात इस्लामपूरमधून जयंत पाटील, काटोलमधून अनिल देशमुख, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख नावांचा समावेश आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड तसेच बारामतीमधून अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

मराठवाड्यातील सर्व उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत!

शरद पवार गटाने मराठवाड्यातील आपले सर्व उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. मराठवाड्यातील काही महत्वा मतदारसंघांपैकी असलेल्या परळी, बीड आणि माजलगावचा उमेदावर अद्याप जाहीर झालेला नाही. बीडमध्ये संदीप क्षिरसागर यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध असल्यामुळे उमेदवार कोण असेल? हे पाहणे महत्वाचे आहे. याशिवाय, माजलगाव आणि परळीमधून अजित पवार गटात गेलेल्या प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडेंसारख्या मत्तबर नेत्यांसमोर कोणाला उमेदवारी द्याययी, हे पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे.

शरद पवार गटाची यादी!

अनिल देशमुख – काटोल

राजेश टोपे -घनसावंगी

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

मुंब्रा – जितेंद्र आव्हाड

कोरेगाव – शशिकांत शिंदे

वसमत – जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर

राहुली – प्राजक्त तनपुरे

शिरूर – अशोक पवार

विक्रमगड – सुनील भुसारा

कर्जत जामखेड – रोहित पवार

अहमदपूर- विनायक पाटील

सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे

भोकरदन – चंद्रकांत दानवे

तुमसर – चरण वाघमारे

केज – पृथ्वीराज साठे

बेलापूर- संदीप नाईक

वडगाव शेरी – बापू पठारे

रोहिणी खडसे – मुक्ताई नगर

मुरबाड – सुभाष पवार

घाटकोपर – राखी जाधव

आंबेगाव – देवदत्त निकम

बारामती – युगेंद्र पवार

शेवगाव – प्रताप ढाकणे

पारनेर – राणी लंके

आष्टी – महेबूब शेख

करमाळा – नारायण पाटील

सोलापुर शहर उत्तर – महेश कोठे

चिपळूण -प्रशांत यादव

कागल – समरजीत घाडगे

तासगाव – रोहित आर आर पाटील

हडपसर- प्रशांत जगताप

शिराळा – मानसिंगराव नाईक

अहमदपूर – विनायकराव पाटील

सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर -सुधाकर भालेराव

किनवट- प्रदीप नाईक

जिंतूर -विजय भांबळे

मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे

तिरोडा – रविकांत बोपछे

अहेरी -भाग्यश्री अत्राम

बदनापूर- बबलू चौधरी

मुरबाड- सुभाष पवार

कोपरगाव -संदीप वर्पे