आज २२ ऑक्टोबर मंगळवार असून बुध, मिथुन राशीत चंद्राचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे त्रिपुष्कर योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत होईल. त्यामुळे कुठल्या राशींसाठी आजचा दिवस लकी असेल? जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?
मेष – कामासंदर्भात किंवा कामाच्या ठिकाणी चिडचिड होईल अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे. लाभ तर होईल पण तो अधिक काळ टिकणारा लाभ असेल असे वाटत नाही.
वृषभ – भाग्योदय होणार आहे, पण हा लाभ आपण आपल्या कर्मानुसार टिकवणार आहात. उच्च शिक्षणात उत्तम प्रगती लाभणार आहे.
मिथून – व्यवसायात उत्तम भरभराट होऊ शकते. इच्छा पूर्ण होतील, परंतु तेवढाच खर्च देखील होईल याची दक्षता घ्यावी.
कर्क – केवळ अधिक प्रयत्नानेच कार्ये पूर्ण होतील व त्यातून लाभ मिळू शकेल. आपल्या नाजूक मनाचा या काळात कोणीही फायदा घेऊन फसवू शकतो त्यामुळे सावध राहा.
सिंह- आपण अनेक प्रयत्ने करून देखील अपेक्षित धनलाभ होत नाही अशा प्रकारे विचार मनात येत आहेत. त्यामुळे आपला किती खर्च होतो त्याकडे प्रथम लक्ष द्या.
कन्या – घरातली कामांकडे लक्ष द्या अन्यथा घरातील लोक तुमच्यावर नाराज राहतील. अधिक आळशीपणा निर्माण होऊ शकतो.
तूळ – संतती सुख मिळेल, शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रात पैसे गुंतवू नका नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च अधिक होईल. काळजी नसावी तेवढाच लाभ देखील होण्याची शक्यता. तसेच आपल्यावरील जबाबदारी वाढेल.
वृश्चिक – सर्व कार्ये नियमीत होतील परंतु त्याचा लाभ मिळणार नाही किंवा कमी प्रमाणात मिळेल
धनु – घरगुती कामे किंवा घरगुती व्यवसायात उत्तम लाभ होऊ शकतो.
मकर – प्रेमात यश मिळेल. अभ्यासात विशेष प्रगती साधाल, व्यवसायातील कार्यात मदत मिळेल. संततीसुख मिळेल. कामाच्या ठिकाणी विशेष लाभ होऊ शकतो. वाहने सावकाश चालवा.
कुंभ – आजारावर औषधी काम करतील, प्रतिकार शक्ती वाढेल, प्रसन्नता जाणवेल.
मीन – मनात असलेल्या गोष्टी आपल्या जोडीदाराकडे व्यक्त करा, काही गोष्टी बोलल्याशिवाय विषय लक्षात येत नाहीत. पार्टनरशिप मधे पैसे गुंतवू नका.