Horoscope today 4 October 2024: आज नवरात्रीचा दुसरा दिवस, स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग; जाणून घ्या कुणावर राहील देवीची कृपा? वाचा शुक्रवारचे राशीभविष्य!

आज ४ ऑक्टोबर शुक्रवार असून नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज ब्रह्मचारिणी देवीची विधीवत पूजा केली जाईल. त्यामुळे जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा आहे?

मेष

घरातील लोकांवर चिडचिड होण्याची शक्यता आहे त्यामुळे कमीत कमी संवाद साधा. घरासंदर्भातील कामे होतील, जुन्या लोकांकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता, व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी चांगल्या घटना घडू शकतील.

वृषभ

आपल्या परीक्षे संदर्भात चांगले फळ मिळण्याची शक्यता. आज सुखकर प्रवास घडतील, प्रेम मिळेल, विद्वान लोकांची भेट होईल, शेअर मार्केटमध्ये लाभ होण्याची शक्यता, इष्ट देवतेची आराधना करावी. प्रसन्नता वाटेल.

मिथून

कामाचे अधिक टेन्शन घेऊ नये, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, जेवढे मोकळे राहाल तेवढे आरोग्य उत्तम राहील. प्रतिकार शक्ती उत्तम लाभेल, शत्रूंपासून सावधान राहावे, काही ताणतणाव नाहीच अशीच कल्पना करावी.

कर्क

आपल्या गुरुजनांची भेट होण्याची शक्यता आहे. उत्तम मार्गदर्शन मिळेल. पत्नीकडून लाभ होण्याची शक्यता. पार्टनरशिप मधून फायदा होऊ शकतो. दूरचे प्रवास घडतील. कुलदेवतेचे दर्शन घ्यावे इष्ट कार्य पूर्ण होतील.

सिंह

आज एकांत जाणवू शकतो. अध्यात्मिक विचार येऊ शकतात. प्रवासाची इच्छा होईल. वाहने सावकाश चालवा. साधारण दिवस उत्तम जाईल. जुन्या लोकांची भेट होऊ शकते. आरोग्य सांभाळावे.

कन्या

शिक्षणासंदर्भात कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडेल. दुहेरी विचार निर्माण होतील परंतु अंती उत्तम निर्णय घ्या. नैसर्गिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने आरोग्य सांभाळावे.

तूळ

नोकरीच्या ठिकाणी चांगल्या घटना घडू शकतील. व्यवसायात चांगले लाभ होण्याची शक्यता. आपले सिनियर अधिकारी आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. प्रमोशन इत्यादी सारख्या घटना घडण्याची संभावना आहे किंवा अशाच प्रकारे चांगले कार्य घडू शकतात.

वृश्चिक

बंधू भगिनी किंवा मित्रमंडळी यांच्याकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता दिसते. जवळचे प्रवास घडतील. सावधान राहावे आज फसवणुक होण्याची शक्यता आहे. आजच्या कार्यात उत्तम यश मिळू शकेल.

धनु

घरासाठी खर्च होऊ शकतो. हॉस्पिटल मध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. व्यर्थ खर्च करू नये, शक्यतो आज दूरचा प्रवास टाळा. गृहसौख्यासाठी झालेला खर्च चांगल्यासाठीच होईल. तरीही सावधानतेने खर्च करावा.

मकर

आज अधिक कामे होतील परंतु तरीही प्रसन्नता जाणवेल, कारण आपल्या कामाचा योग्य नफा आज आपल्याला मिळू शकतो. आज चांगले लोक भेटू शकतात. संशयी स्वभाव ठेवू नये जे पण लोक भेटतील योग्य भेटतील काळजी नसावी.

कुंभ

आज कुटुंब सुख मिळण्याची शक्यता. वाणी उत्तम ठेवाल तर लाभ देखील उत्तम होईल. धनासंदर्भात आज छान फायदा होण्याची शक्यता. मात्र आरोग्याची तक्रार येईल असे दिसते. त्यामुळे बाहेरील खाणे टाळावे, आरोग्याची काळजी घ्यावी.

मीन

शेजारी लोकांशी सावधानता बाळगा किंवा प्रवासात सावधान रहा फसवणुक होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो प्रवास टाळावा. कामे मात्र नियमित होण्याची शक्यता. अनपेक्षित खर्च होऊ शकतो. साधारण आरोग्य सांभाळावे.