पाकिस्तानी अभिनेते फवाद खान आणि माहिरा खान यांचा ब्लॉकबस्टर “द लिजेंड ऑफ मौला जट” या तारखेला भारतात प्रदर्शित होणार!

हिंदी चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या पुन्हा प्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. फवाद खान देखील अभिनेत्री वाणी कपूरसोबत काम करत आहे पण तो एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. मात्र, आता १० वर्षांनंतर भारतीय चाहत्यांना त्यांचे आवडते कलाकार फवाद खान आणि माहिरा शर्मा यांना भारतात चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, फवाद खानपासून माहिरा खान आणि अली जफरपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी चित्रपट १० वर्षांनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार!

फवाद खान आणि माहिरा खान या दोघांचेही भारतासोबतच पाकिस्तानमध्येही खूप चाहते आहेत. एका दशकानंतर लोकांना भारतीय चित्रपटगृहांमध्ये पाकिस्तानी चित्रपट पाहायला मिळणार आहे.
माहितीनुसार, २०२२ साली प्रदर्शित झालेला पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ आता भारतात प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजते. बिलाल लश्री दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान व्यतिरिक्त सायमा बलोच आणि हुमैमा मलिक यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे ज्याने जगभरात केली कमाई!

फवाद खानच्या ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५ कोटी रुपये होते, परंतु या चित्रपटाने जगभरात २७४.७ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये एकूण ११५ कोटींची कमाई केली होती आणि इतर देशांमध्ये या चित्रपटाने १६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. तसेच, हा पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे ज्याने जगभरात एवढी कमाई केली आहे. भारतात पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगला व्यवसाय करत आहेत, आता पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यावर काय आश्चर्यचकित करेल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

बिलाल लश्री यांची इंस्टाग्रामवर पोस्ट काय?

बिलाल लश्री यांनी इंस्टाग्रामवर रोमांचक बातमी शेअर करताना लिहिले, “भारतात, पंजाबमध्ये बुधवारी, २ ऑक्टोबर रोजी आमचा सिनेमा रिलीज होत असून यासाठी मी खूप उस्तुक आहे. दोन वर्षे झाली आहेत, आणि अजूनही पाकिस्तानमध्ये वीकेंडला हा सिनेमा हाऊसफुल्ल आहे. आता, या प्रेमाच्या श्रमाची जादू अनुभवा!” असे ते म्हणाले. दरम्यान, या चित्रपटाच्या पोस्टरसोबत त्यांची ही पोस्ट होती.