या ५ व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये सर्वांत जास्त व्हिटॅमिन बी-१२; संपूर्ण शरीराच्या विकासासाठी देखील आवश्यक! वाचा नेमके काय?

आपल्या शरीराच्या विकासासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो. या आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी १२, ज्याच्या कमतरतेमुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते. निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे २.४ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी १२ ची आवश्यकता असते. जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते. चला जाणून घेऊया या व्हिटॅमिनची गरज पूर्ण करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खावेत.

दरम्यान, व्हिटॅमिन बी १२ साठी तुम्हाला नेहमी मांसाहार किंवा अंडी खाण्याचीच गरज नाही, तर तुम्ही ते खाण्याऐवजी काही हेल्दी शाकाहारी खाऊन सुद्धा व्हिटॅमिन बी १२ वाढवू शकता. काही शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ असते. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या
व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ भरपूर असते?

1) दूध आणि डेअरी उत्पादने

व्हेजिटेरीयन लोकांसाठी व्हिटॅमिन बी-१२ मिळवण्यास दूध आणि याची डेअरी खूप महत्त्वाचे ठरते. जसे की दही,पनीर, तूप. गाईच्या दूधात व्हिटॅमिन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. याने व्हिटामीन्सची आवश्यकता पूर्ण करता येते. रोज १ ग्लास दूध प्यायल्याने व्हिटॅमिन बी-१२ ची कमकरता आपण भरून काढून शकतो.

2) फोर्टिफाईड प्लांट बेस्ड मिल्क

सोया मिल्क, बदाम मिल्क आणि ओट्स मिल्क आणि प्लांट बेस्ड दूध हे व्हिटॅमिन बी-१२ फोर्टिफाईड आहे. तसेच हे शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी उत्तम असते. हे उत्पादन व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. बाजारात मिळणारे फोर्टिफाईड मिल्क खूप फायदेशीर ठरते. लॅक्टोज इन्टॉल्स असणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

3) फोर्टिफाईड धान्य

फोर्टीफाईड अन्न बाजारात उपलब्ध असते हा एक चांगला पर्याय आहे यात व्हिटॅमिन बी-१२ असते. खासकरून शाकाहारी लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. नाश्त्याला तुम्ही या पदार्थांचे सेवन करू शकता. फोर्टिफाईड अन्न फक्त व्हिटॅमिन बी-१२ चा सोर्स नसते. तर यात इतरही पोषक तत्व असतात जे संपूर्ण शरीराच्या विकासासाठी आवश्यक असतात.

4) न्युट्रिशनल यीस्ट

न्युट्रिशनल यीस्ट एक व्हेजिटेरीयन सुपरफूड आहे ज्यात व्हिटॅमिन बी-१२ चे चांगले प्रमाण असते. सॅलेड, पास्ता किंवा सूपमध्ये घालून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. याची चव थोडी चीझप्रमाणे असते म्हणून शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात याचा समावेश करायला हवा. फोर्टिफाईड न्युट्रिशनल यीस्ट व्हिटॅमिन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे.

5) मशरूम

काही प्रकारचे मशरूम व्हिटॅमिन बी-१२ चांगल्या प्रमाणात देतात. हे मशरूम पूर्णपणे शाकाहारी असतात. तुम्ही नियमित याचा आहारात समावेश करू शकता. मशरूमध्ये इतर पोषक तत्वही असतात. जे संपुर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.