कोणतीही गोष्ट मर्यादेतच हवी. मर्यादा ओलांडल्यास विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या व्यक्तीने दररोज किती साखर (Sugar) खावी, हे पूर्णपणे तो दररोज किती शारीरिक हालचाली करतो यावर अवलंबून असते. जास्त साखर खाणे शरीरासाठी फायदेशीर नाही. जास्त साखर खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. गरजेनुसार थोडी साखर खाऊ शकता. पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात किती चमचे साखर खावी? किंवा जास्त सेवन केल्यास शरीराला कोणत्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते, चला जाणून घेऊया.
बहुतेक लोक गोड खाण्याचे शौकीन!
बहुतेक लोक गोड खाण्याचे शौकीन असतात. कोणताही सण असो किंवा समारंभ असो, मिठाई नक्कीच तयार केली जाते. पण जास्त साखर खाणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते. गोड खाल्ल्याने शरीरात अनेक आजार निर्माण होतात. तसेच, भारतातील लोक जितके गोड खातात तितके जगात क्वचितच कोणी खात असेल. लग्नापासून वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत प्रत्येक फंक्शनमध्ये मिठाई नक्कीच तयार केली जाते. इतकेच नाही तर बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खातात, परंतु अती साखरेचे व्यसन लागले की, ते शरीरासाठी धोकादायक ठरते.
एका दिवसात किती चमचे साखर खावी?
निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर एका व्यक्तीने एका दिवसात ६ चमच्यापेक्षा जास्त साखर खाऊ नये. याच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता. तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
साखर खाल्ल्याने वजन वाढतं?
साखर खाल्ल्याने वजन वाढतं का? असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. तर हे खरे आहे. साखर खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. मात्र, वजन वाढण्याचे हेच एक कारण नाही. इतरही अनेक गोष्टींमुळे वजन वाढते. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, साखरेचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होऊ लागता. ज्यामुळे शरीराचे वजन वाढते. अनेक हेल्थ एक्सपर्ट जास्त साखर न खाण्याचा सल्ला देतात. साखर शरीरात कॅलरी वाढण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे.
साखर खाण्याचे नुकसान!
– जर तुम्ही फार जास्त प्रमाणात नियमितपणे साखरेचे सेवन करत असाल तर तुम्हाला टाइप १ डायबिटीस होण्याचा धोका असतो.
– जर तुम्ही रोज जास्त साखर खात असाल तर तुमच्या पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिनचे उत्पादन अधिक प्रमाणात होऊ शकते.
– साखरेच्या जास्त सेवनाने तुम्हाला हृदयासंबंधी समस्या होण्याचा धोका असतो.
– तसेच नेहमीच जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढते.
– जास्त गोड खाल्ल्याने डोकेदुखी आणि तणाव यांसारख्या समस्याही होतात.