बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता; संपूर्ण शहरात इंटरनेट सेवा बंद!

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: j; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: NightHDR; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 245.20822; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

ठाणे : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जनक्षोभ झाला. पालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून येत मोठे आंदोलन केले. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन रात्री पर्यंत सुरू होते. या आंदोलनामुळे संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यानंतर रात्री परिस्थिती आटोक्यात आली होती. तसेच, आज भारत बंदी देखील आहे. अशातच बदलापूरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे.

दरम्यान, आज बदलापूर मधील संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त ठेवला असून इथे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, शहरात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. मात्र सकाळपासून लोकल सेवा सुरळीत असल्याचे समजते.

बदलापूरमध्ये जमावबंदी लागू!

बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेले आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर संपुष्टात आले. सध्या बदलापूर बंद आहे. सर्व दुकानेही बंद आहेत सध्या आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत, त्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेटही बंद ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी काही लोकांना अटक केली असून आंदोलनला हिंसक वळण देणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. येत्या १० दिवसांत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात इंटरनेट सेवा बंद!

सोशल मिडियावरून खोटा प्रचार होऊन पुन्हा जनक्षोभ उसळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहरात इंटरनेट सेवा काल रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. बदलापुरातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरातील जनजीवन सुरळीत सुरू आहे. बदलापूर स्थानकावरही कमी गर्दी आहे.