रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव काय? सोन स्वस्त की महाग? वाचा सोने-चांदीचा भाव!

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उताराचे सत्र पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आता बाजारही अधिक उजळला आहे. सणासुदीला सोन्याची मागणीही वाढते हे काही नवीन नाही. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी-मंदी नोंदवली जात आहे. अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती, पण जागतिक घडामोडींची पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले मात्र चांदीची चमकही फिकी पडली.

रक्षाबंधनाच्या दिवशी आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,२७७ रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,६७० रुपये प्रतिग्रॅम इतकी आहे. बाजारात आज सोन्याला झळाळी आली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

-१० ग्रॅम सोनं किंमत?

१० ग्रॅम २२ कॅरेट ६६,८५० रुपये

१० ग्रॅम २४ कॅरेट ७२,९२० रुपये

१० ग्रॅम १८ कॅरेट ५४,७००० रुपये

-१ ग्रॅम सोनं किंमत?

१ ग्रॅम २२ कॅरेट ६,६८५ रुपये

१ ग्रॅम २४ कॅरेट ७,२९२ रुपये

१ ग्रॅम १८ कॅरेट ५,४७० रुपये

-८ ग्रॅम सोनं किंमत?

८ ग्रॅम २२ कॅरेट ५३,४८० रुपये

८ ग्रॅम २४ कॅरेट ५८,३४६ रुपये

८ ग्रॅम १८ कॅरेट ४३,७६० रुपये

चांदी इतके रुपये किलोग्रामवर स्थिरावली!

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास चांदी ६५० रुपयांनी मजबूत झाली आहे. चांदी आज ८३८६५ रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड २५०० डॉलर आणि चांदी २९ डॉलरच्या वर व्यवहार करत आहे. ग्लोबल जियो राजकीय संघर्षामुळे क्रूड ऑइलचे भावही ८० डॉलर प्रति बॅरेलवर स्थिरावले आहेत.

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात २ कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.