बीएसएनएल – एमटीएनएल मध्ये डील; मिळणार 4G-5G सेवांचा लाभ!

अनेक प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. यात जिओ एअरटेल यांसारख्या कंपनीने तर आपल्या युझर्सला सीम कार्ड बदलण्यास भाग पाडले आहे. यासोबतच जियोचे नेटवर्क देखील फार डाऊन असते अशातच आता बीएसएनएल फार चर्चेत आलेला असून अलीकडेच कंपनीने आता एक नवीन करार देखील स्थापित केला आहे.

सध्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी एक डील केली आहे. तसेच, बीएसएनएल प्रमाणेच एमटीएनएलनेही खासगी कंपन्यांप्रमाणे 4G सेवा सुरू केलेली नाही. आता लवकरच दोन्ही कंपन्यांनी वापरकर्त्यांना 4G आणि 5G सेवांचा लाभ देण्याची जबाबदारी घेतली आहे. एमटीएनएलने ने बुधवारी (14 ऑगस्ट 2024) झालेल्या बोर्डाच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. कंपनीने बीएसएनएलसोबत 10 वर्षांच्या सेवा कराराची माहिती दिली. हा सेवा करार नेटवर्क शेअरिंग आणि नवीन जनरेशन टेलिकॉम संदर्भात असल्याचे समजते.

BSNL-MTNL चा अग्रीमेंट!

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) यांनी सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे. एमटीएनएल ऑपरेशन्स बीएसएनएलला मागे टाकू शकतात ही बातमी खूप पूर्वी मथळ्यात होती. त्यातच आता एमटीएनएल बोर्डाने आता सेवा कराराला ग्रीन सिग्नल दिला आहे. हा करार कंपन्यांनी 10 वर्षांसाठी केला आहे. सध्या याला DoT कडून होल्ड करण्यात आले आहे.

MTNL स्थिती!

एमटीएनएल या कंपनीवर 31,994.51 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एमटीएनएलच्या सर्व कामकाजाची जबाबदारी बीएसएनएलने घेतली आहे. एमटीएनएल शक्य तितक्या लवकर बाजारात परत यावे हे बीएसएनएलचे उद्दिष्ट आहे. सध्या अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या एमटीएनएलकडून किमान बाजाराचा खर्च भागवला जाऊ शकतो. BSNL आधीच दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये आपले नेटवर्क मजबूत करत आहे. अशातच आता 4G आणि 5G चा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेत्र सध्या एमटीएनएलद्वारे सेवा देत आहेत.