आज बुधवार 7 ऑगस्ट रोजी लक्ष्मी नारायण राजयोग अत्यंत प्रभावी होणार आहे. त्यामुळे, तुमचा आजचा दिवस कसा असेल? आणि कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? हे जाणून घ्या.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी नवे करार होण्याची शक्यता आहे. व्यापारात फारसा फायदा होणार नाही.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करा. इतरांना नाराज केल्याशिवाय स्वत:ची कामे पूर्ण करा.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी नव्या कामाची सुरुवात करु नका. आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होऊ शकते.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी कोणी व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करेल अशी संभावना. तसेच, आरोग्यात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल, अशी शक्यता. कुटुंबातीलच काही व्यक्तींमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मनाविरुद्ध खर्च होऊ शकतो. आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी थोडे संयम आणि धीराने काम करावे. विचारात असलेली कामे पूर्ण होतील अशी शक्यता.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कामात नवीन प्रयोग केल्यास फायद्याची शक्यता आहे. नवीन व्यवहार सुरु केल्यास फायद्याचा ठरु शकतो.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नवीन नोकरी किंवा प्रमोशनच्या प्रयत्नात असाल तर, प्रयत्न सफल होऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडी असू शकते.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणाशी तरी वादावादी होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्याच्या तब्येतीमुळे मन चिंतेत राहू शकते.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी घरात पाहुणे येण्याची शक्यता. वडीलधाऱ्या मंडळीकडून पैशांची मदत होणार अशी शक्यता.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी स्वत:साठी वेळ काढू शकणार आहात. अकडलेली कामे मार्गी लागणार आहे.