अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती आणि आता बॉलिवूडचा खिलाडी कुमार मोठ्या स्टारकास्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपटाची कथा ३ जोडपी आणि त्यांच्या मित्राभोवती फिरणारी आहे.
अक्षय कुमारचा हा मल्टीस्टारर चित्रपट ट्रेलरवरून रंजक दिसत आहे.पण ट्रेलर पाहताना,तुम्हाला नक्की असे वाटले असेल की हा चित्रपट किंवा कथा तुम्ही यापूर्वीही पाहिलं आहे.तर तुम्ही बरोबर आहात.जर आपण ‘खेल खेल में’ या कथेकडे लक्ष दिले तर ते २०१६ च्या इटालियन चित्रपट ‘परफेक्ट स्ट्रेंजर्स’ सारखा आहे.यामध्ये देखील चंद्रग्रहणाच्या रात्री ७ मित्रांनी डिनर पार्टी केली आहे. या दरम्यान लोक मोबाईल फोन सर्वांसमोर ठेवतात आणि एकमेकांना मेसेज पाठवतात.सुरुवातीला या खेळात काहीच मजा नाही.मात्र नंतर लोकांचे असे रहस्य समोर येतात, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर आणि वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होतो.
यापूर्वीही चित्रपटांमध्ये अशीच कथा!
२०१८ मध्ये या चित्रपटाचा फ्रेंच रिमेक बनवण्यात आला होता, ज्याचे नाव ‘नथिंग टू हाइड’ होते. यातही संमिश्र कथा पाहायला मिळाली. फ्रेंच व्यतिरिक्त हा चित्रपट साऊथ चित्रपटसृष्टीतही रुपांतरित झाल्याचे दिसते. सुपरस्टार मोहनलालच्या २०२२ मध्ये आलेल्या मिस्ट्री थ्रिलर चित्रपट 12th Man ची कथा अशीच काही होती. मात्र तो चित्रपट वेगळा ट्विस्ट घेऊन तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट ‘लाउडस्पीकर’ देखील असाच होता. त्यामुळे आता दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यातून काय आश्चर्य व्यक्त करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
१५ ऑगस्टला होणार रिलिज!
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होत असून यामध्ये अक्षय कुमार, एमी वर, तापसी पन्नू आणी वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.