इरफान खान यांची आठवण काढत अभिनेत्रीने सांगितला शूटिंग दरम्यानचा तो किस्सा म्हणाली…..

 

मुंबई : आपल्या अभिनयाने चित्रपटांना चैतन्य देणारा उत्तम अभिनेता म्हणजे इरफान खान आजही या अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत, जरी हा अभिनेता आता आपल्यात नसला तरी त्याचे सर्वोत्कृष्ट चित्रपट त्याच्या आठवणी आपल्यात कायम राहतील. अशातच आता अभिनेत्री राधिका मदन हिने २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंग्रेजी मिडीयम’ या चित्रपटाबाबत बोलताना इरफान खान यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

एका मुलाखती दरम्यान बोलताना राधिकाने सांगितले की, चित्रपटात असा एक सीन होता, ज्या ठिकाणी मला दारू प्यायल्याचा अभिनय करायचा होता. त्या सीनची आम्ही तयारीही केली त्यानंतर दिग्दर्शक होमी अजदानिया यांनी मला सांगितले की, दारू प्यायलाचा अभिनय करताना त्या भावना वाढव. तो सीन शूट करत असताने त्यावेळी इरफान सर सेटवर आले आणि ते आम्हाला म्हणाले की, हे चक्क खोटे आहे, कारण तुम्ही दारू प्यायला आहात हे तुमच्या अभिनयातून मला पटू शकत नाही. हे खोटे असल्याचे मी नक्की पकडेन, असे ते म्हणाले आणि त्यामुळे सुरुवातीला मी माझ्या अभियातून इरफान सरांना हे पटवून देऊ शकले नाही की, मी दारूच्या नशेत आहे, अशी शूटिंग दरम्यान ची आठवण तिने सांगितली. दरम्यान, इरफान खान आणि राधिका मदन यांच्या या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातील बाप लेकीच्या जोडीला प्रेक्षकांकडून फार पसंती देखील मिळाली होती.
सध्या, राधिका ही नुकतीच बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारबरोबर ‘सरफिरा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनय करताना दिसली आहे.