NIA investigates terror attack  | जम्मू-काश्मीर : एनआयएचे तपास पथक दाखल

रियासी जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात जिहादी दहशतवाद्यांनी रविवारी भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. यात एका बालकासह 9 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यादरम्यान बस खोल दरीत पली. या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक आज, सोमवारी घटनास्थळी दाखल झाले आहे. (terror attack  )

प्रवाशांनी भरलेली बस (जेके 02 एई 3485) शिवखोडीहून कटरा येथे परतत होती. बसमध्ये 42 प्रवासी होते, सर्व प्रवाशांना घेऊन ही बस शिवखोडीकडे निघाली होती. दर्शनानंतर परतत असताना पौनी आणि शिवखोडी दरम्यान कांडा त्रयथ परिसरात चंडी मोडजवळ आधीच दबा धरून बसलेल्या जिहादी दहशतवाद्यांनी बससमोर येऊन गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुमारे 200 फूट खोल खड्ड्यात पडली. बस खाली पडल्यावर तिथे उपस्थित असलेल्या इतर दहशतवाद्यांनी मागून गोळीबार केला. यात 9 जण मृत्यूमुखी पडले तर 33 जण जखमी झाले. आता या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार आहे. एनआयएचे पथक पोलिसांना मदत करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे पोहोचले आहे. एनआयए फॉरेन्सिक टीम ग्राउंड लेव्हलवरून पुरावे गोळा करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.दुसरीकडे, भारतीय लष्कराकडून रियासीमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जंगल परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.